युरोप पर्यटन – जीवनात पर्यटन म्हणजे ज्ञानानंद …. !
पर्यटन म्हणजे देव निर्मित निसर्गाची विविध अनंत रूपे …अवतार पाहण्याची संधी . लोकांची धम्माल … चविष्ट खानपानाची चंगळ ! देश विदेशातील निरनिराळ्या अनेक संकृती … कलेची ओळख … मानवनिर्मित प्राचीन- अर्वाचीन कला – वास्तू – शिल्प आश्चर्य पाहून थक्क व्हायचे. आता आपला भारत देशच बघाना … अफाट …अचाट देश. सुजलाम – सुफलाम सस्य शामलाम देश. काश्मीर – मनाली येथील हिमालय म्हणजे स्वर्गच ! राजस्थान मधील राजवाडे, तामिळनाडू – कर्नाटकातील पुरातन शिल्पकलेचा आविष्कार असलेली मंदिरे म्हणजेच कला संस्कृतीचा खजिना. कन्याकुमारी येथील सागराचा त्रिवेणी संगम ! अजंठा – एलोरा सारखी लेणी ल्यायलेला कणखर महाराष्ट्र ! तत्सम विविधतेने भरलेला – नटलेला भारत देश … !!
भारताबाहेर परदेशगमानाबद्दल बोलायचे तर … मालदीव – मॉरिशियस येथील नितळ , निळेशार समुद्र व लोण्याहून मऊशार वाळूचे बीचेस … अमेरिकेतील भव्य दिव्य शहरे स्टॅचू ऑफ लिबर्टी … ऑस्ट्रेलियातील ओपेरा- ब्रिजेस … थायलंड मधील आदरातिथ्य … पण या सर्वांमध्ये युरोप खंड हा तर जगभरातील पर्यटकांचा पसंतीचा मुकुटमणीच!
युरोप म्हणजे प्राचीन – ऐतिहासिक व आधुनिक संस्कृतीचा अनोखा संगम. निसर्गाचे वरदान लाभलेला … नैसर्गिक , सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक संपत्तीला आपुलकीने व आत्मियतेने जपणारा … जतन करणारा , स्वच्छता व शिस्तीचा आरसा.… तंत्रज्ञान व विज्ञानात अग्रेसर … दोन महायुद्धांच्या जखमांचे व्रण अंगावर बाळगणारा … तरीही इतिहास जपणारा … नैसर्गिक आणि मानव निर्मित आश्चर्याचा खजिना म्हणजे युरोप ! पर्यटनाच्या दृष्टीने युरोप म्हणजे वेस्टर्न युरोप , इस्टर्न युरोप, सेन्ट्रल युरोप , स्कँडिनेव्हिया, सदर्न युरोप असा विभागाला गेला आहे. यात वेस्टर्न युरोप सधन, प्रगत व पर्यटनात चांगलाच विकसित आहे. त्यामुळे युरोप पर्यटनामध्ये सर्वात प्रथम वेस्टर्न युरोपलाच पसंती मिळते. कारण वेस्टर्न युरोप मध्ये सर्वात प्रगत अग्रेसर देश येतात ते म्हणजे इंग्लंड – लंडन, फ्रांस – पॅरीस , बेल्जियम , ब्रुसेल्स, जर्मनी – बर्लिन , लग्झम्बर्ग, नेदरलंड म्हणजेच हॉलंड – अमस्टरडॅम , स्विझर्लंड – बर्न , ऑस्ट्रिया – व व्हिएन्ना, इटली – रोम. या देशांनी आपली युरोपियन युनिअन देखील बनवली आहे. त्यामुळेच युरो ही समान चलन / करन्सी आहे. त्यांची वेगळी पार्लमेंट ब्रुसेल्स येथे आहे.
तर अशा ह्या युरोपच्या सहलीत आहे तरी काय ?इटली मध्ये संपूर्ण वेस्टर्न सिविलायझेशनचा पाया असलेली संस्कृती म्हणजे रोमन संस्कृती. २००० वर्षापूर्वीच्या संपन्न रोमन संस्कृतीचे भग्नावशेष वास्तू आज देखील इटलीमध्ये प्रत्येक गावागावात जतन केलेले आढळतील. रोम मधील ग्लाडीइटर फेम कलोझीयम , ज्युलिअस सीझर फेम रोमन फोरेम, रेनेसान्स आर्टची जन्मभूमी फ्लोरेंस , पिसाचा कलता मनोरा, मार्कोपोलोचे कालव्यांचे शहर … व्हेनिस … दो लब्जो की ये कहानी आठवतंय ना ?
ख्रिश्चन धर्मियांचे सर्वश्रेठ धर्मस्थान व्हाटीकन… जगभरातील पर्यटकांना इटलीकडे पर्यायाने रोमकडे खेचून आणतात. म्हणूनच असे म्हणतात की जगातील सर्व रस्ते रोमकडे येतात.
वॉटर मॅनेजमेण्ट राबवून … समुद्र मागे हटवून जमीन व त्या जमिनीवर ट्युलिप, डॅफोडील्सची शेती फुलवणारा हॉलंड . सारे जग देवाने बनवले असेल पण अमस्टरडॅम आम्ही बनवले ” असे इथले इंजिनियर अभिमानाने सांगतात … देखा एक ख्वाब और सिलसिले हुए …
महाराष्ट्राच्या ८ पटीने लहान …. स्वित्झर्लंड ! आणि हिमालयाच्या लांबी , रुंदी व उंचीत अर्धा असलेल्या आल्प्सची हिमशिखरे … पण या आल्प्स पर्वतरांगांतील निसर्गाचा आनंद घेण्याकरता स्विस लोकांनी काय करामती केल्या आहेत ते पाहून त्यांना सलाम. उगाच नाही स्वित्झर्लंड जगातील पर्यटकांचे पहिल्या नंबरचे नंदनवन आहे . यश चोप्रांच्या फिल्म्स मधील अनेक लोकेशन्स / फ्रेम्स त्याची साक्ष देतात.
जर्मनीतील प्रवासात … ऱ्हाईन नदीच्या समुद्र सुपीक खोरी व त्यातील द्राक्षांचे मळे व छोटी छोटी सुबक देखणी गावे पाहून डोळ्यांची पारणी फिटते. आयफेल टॉवर असलेले शानदार सुंदर हिरवे , वेल प्लांड कलात्मक पण झगमगीत ,डान्सिंग वायब्रंट , पॅरीस शहर . अेन इव्हनिंग इन पॅरीस…
सायबांच्या इंग्लंडच्या राजधानी लंडनचा रुबाब शान ,ऐश्वर्य , थाट काही औरच. थेम्स नदीच्या काठावरील लंडन आय ची उंची नजर खिळवून ठेवते. बिदोवन व मोझार्टच्या संगीत प्रिय ऑस्ट्रिया मधील इन्सब्रुक आणि साउंड ऑफ म्युझिक फेम, साल्सबर्ग ही शहरे म्हणजे जणू काही म्युझियमच .
Yellow-Tulips-Flowersअशा या युरोपचे वर्णनच एवढे सुंदर तर या युरोपची सहल प्रत्यक्ष याची देही याची डोळा स्वत: अनुभवणे किती सुंदर असेल. युरोप सहल सुंदर आहे प्रश्नच नाही . पण सुंदर गोष्टी सहज सोप्या नसतात. सहल खर्च महागडा आहे पण सहल अविस्मरणीय अगदी लाईफटाईम एक्सपिरीयंस ! असे मानतात कि युरोप पहिले कि अर्धे जग बघून झाले. इतर सर्व ठिकाणी युरोपचीच कोपी – छाप आहे. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है… कुछ मेहनत करनी पडती है.
युरोप सहल धावत पळतच का ? निवांत पणे आरामात का नाही ? इतक्या सुंदर गोष्टी पाहण्याकरता वेळ नाही ? २/३ शहरे आरामात बघू … संपूर्ण युरोप निवांतपणे बघायला कमीत कमी २-३ वेळा तरी जायला लागेल. युरो चलन महागडे असल्यामुळे पुन्हा पुन्हा जाणे श्रीमन्तालाच परवडेल .
ग्रुप टूरच का ? प्रायवेट जाणे शक्य आहे पण सोपे नाही . सर्व प्रमुख शहरात मोन्युमेंटस , ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने शहराच्या मध्यभागी आहेत आणि युरोपियन शहरांचे मध्यभाग अरुंद गल्ली बोळ असलेले आहेत. पायी जाण्याशिवाय पर्याय नाही . भाषेचा प्रोब्लेम आहे , इंग्लिश तुटक- मोडकं वापरलं जात. पब्लिक ट्रान्स्पोर्ट , मेट्रो , ट्राम , बसने प्रवास करावा लागतो. टॅक्सी युरोत स्वस्त पण रुपयात महाग आहे . आणि या पर्यायाने एकेक शहराचे महत्वाचे स्थळ दर्शन करायला ३ ते ४ दिवस लागतात. त्यामुळे राहण्याचा खर्च वाढतो. शिवाय आपल्या आवडीचे भारतीय जेवण , शोधा म्हणजे सापडेल एवढे कठीण ! लोकल कॉन्टिनेन्टल फूड वर जगणे तर याहून कठीण ! युरोप मध्ये सर्रास नोन व्हेज फूड … ! व्हेज फूड चे वांदे … !! पर्यायाने १४-१५ दिवसांची युरोप सहल ग्रुप टूरने जाणे योग्यच. सर्व नामवंत कंपन्यांकडे अनेक ओप्शंस असतात.
११ दिवसात युरोप ! किंवा एक लाखात युरोप ! पण ते म्हणजे उपाशी पोटी जेवणाच्या थाळी ऐवजी स्नॅक्सचा पर्याय . एवढा खर्च करून अपुरे – अर्धवट युरोप पाहण्यापेक्षा थोडे आणखी बजेट वाढवून १४ किंवा १५ दिवसांची युरोप सहल उत्तम पर्याय . थोडेसे धावत पळत का होईना संपूर्ण नाही तरी परिपूर्ण युरोप बघणे उत्तम. १५ दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस फिरण्याचा पेशन्स पाहिजे. १५ दिवसानंतर सर्व सारखे वाटायला लागते व कंटाळा येतो.
अशा ह्या युरोप सहलीचे आयोजन – नियोजन देखील फार महत्वाचे आहे. मोजून काही कंपन्या त्यावर मेहनत घेतात. बाकी सर्व ब्लाइंड कॉपी / बिजनेस करतात. सहलीचा रूट , मार्ग फारच महत्वाचा व तो एअरलाईनच्या रुटिंगवर ठरतो. सहल कार्यक्रम , समाविष्ठ स्थलदर्शन , ऐतिहासिक महत्व , भोजन , हॉटेल्स इत्यादी महत्वाचे आहेच , पण सर्वात अत्यंत महत्वाचा असतो तो युरोप मध्ये या सहलीचे सारथ्य करणारा सहल संचालक …. सूत्रधार !! कंपनी कितीही नामवंत असली तरीही सहल संचालक चांगला म्हणजे अनुभवी असला पाहिजे.
मी एवढा हक्काने सांगतो आहे कारण माझ्या २५ वर्षे टुरीझम करियर मध्ये ३ नामवंत कंपनीमधून (केसरी, थॉमस कुक, एस.ओ.टी. सी. S.O.T.C.)१७ वर्षात १०० च्या वर युरोप वाऱ्या केल्या. २०१२ साली स्वत:ची संकल्प टूर्स सुरु केल्या पासून ६ युरोपच्या सहली संकल्पच्या नावाने स्वतंत्र ऑपरेट करून यशस्वी केल्यात व पर्यटकांच्या पसंतीची पावती घेतली आहे.
तर मंडळी युरोपची सहल फक्त स्वस्त असून उपयोग नाही. तर ती मस्त पण व्हायला पाहिजे. तो पर्यटकांचा हक्क आहे. संकल्प टुर्स तर्फे देखील २०१७ मध्ये युरोप – स्कॅंडेनेव्हिया सहलींचे आयोजन केले आहेच. तेंव्हा टूर ऑपरेटर , सहलीचा योग्य पर्याय , योग्य सीजन निवडून युरोप सहल अविस्मरणीय …. व एन्जोय करा . हॅपी जर्नी … बॉंन व्हॉयेज … !!!
-सुनील तारकर
संकल्प टुर्स
आमच्या ऑफिसचा पत्ता :
संकल्प टूर्स अँड ट्रॅव्हल्स
२, गोकुळ निवास, पार्लेश्वर रोड, विलेपार्ले (पु.), मुंबई – ५७.
संपर्क : ०२२२६१७९५५५
सुनील तारकर
संपर्क : ७७३८१२१३८१ / ८४३३६६२६९९